¡Sorpréndeme!

हिट अँड रन प्रकरण, सलमान खान पुन्हा अडचणीत येवू शकतो | Salman Khan Latest News

2021-09-13 4 Dailymotion

2002 च्या हिट अँड रन प्रकरणी बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे 12 आठवड्यानंतर सुप्रीम कोर्ट राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास तयार झाले आहे. या याचिकेत सलमान खानला निर्दोष सोडण्याचा निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. मुंबई हायकोर्टाने सलमान खानला या प्रकरणात निर्दोष सोडले होते. मात्र या प्रकरणावरील पुढील सुनावणी 3 महिन्यांनतर घेण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारीत सलमान खानला महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती. 2002 मध्ये मुंबईतील वांद्रे परिसरात एका दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर इतर 4 जण जखमी झाले होते.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews